देशाभरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आपण देवीचे अनेक असे रूपे बघितली असणार मात्र आजच्या आधुनिक युगात बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून जनजागृतीचा वसा घेतलेल्या आधुनिक नवदुर्गा सिल्लोड तालुक्यात समाज सेवा करीत आहे. सिल्लोड तालुक्यातील सरला कामे यांची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत.
देशात सर्वत्र देवीचा वर्षाभरातील उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूमधाम सुरू असून देवीच्या विविध मूर्ती रुपाची, शक्ती स्थळाची पूजा अर्चा सुरू झाली आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असलेल्या नवं दुर्गेच रूपाने आपल्या बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून जनजागृती करीत आहे.
सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून श्रीमती सरला शामराव कामे कार्यरत असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी त्या नेहमी तत्पर असतात. शिक्षक हा एक समाजसेवक आहे आणि तो समाजाची देणं लागतो ही भावना त्यांच्या मनात रुजलेली असल्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना गुणवंत करण्याबरोबरच देशव्यापी समस्या व मुलींवर होणारे अत्याचार या विषयाचे महाराष्ट्रभर जनजागर करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
सरकारी शाळांमध्ये मुलांना बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून मनोरंजन अध्यापन करीत आहेत आहे. या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ, अंधश्रद्धा निर्मूलन, कोरोना जनजागृती, हरघर तिरंगा मोहीम, एड्स जनजागृती अशा देशव्यापी समस्या, अशा समाजसेवक, नाट्यमय, गावोगाव चौक, या ठिकाणी जनजागृती करून, ग्रामीण भागातील लोक सक्रियपणे जागरूक करीत आहेत आहेत. त्यांनी अनेक भ्रूणहत्या रोखल्या असून दहा गरीब आणि निराधार मुलींना शिक्षणाने दत्तक घेतले आहे. मुलींना स्वावलंबी व सुरक्षेसाठी कराटे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवले आहे.
बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार व प्रसार करून. अध्यापन प्रवाहात आणले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावोगावी जाऊन गावातील कचरा साफ करून तलावातील पाण्याची पातळी स्वच्छ करून ती सतत वापरात आणली आहेत. अत्याचार, अवहेलना, बलात्कार, असे सामाजिक विघातक कृत्य करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा देण्याची मागणी त्या करीत आहे. त्याच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्य सरकार व विविध संस्थांच्या वतीने त्यांना अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या समाजसेवी वृत्तीला लोकशाही न्यूजचा सलाम!